कोल्हापूरला खंडपीठ झालंच पाहिजे – आमदारांची मागणी

0

मुंबई : कोल्हापूरला खंडपीठ झालेच पाहिजे, अशी मागणी करत कोल्हापूरच्या आमदारांनी सभागृहाबाहेर जोरदार निदर्शने केली.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरमध्ये व्हावे, अशी तेथील जनतेची मागणी आहे. कोल्हापूर खंडपीठासाठी वकील, पक्षकार, विविध संघटना यांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. मात्र आश्वासनापलिकडे सरकारने काहीही दिलेले नाही. याद्वारे आम्ही सरकारचे लक्ष वेधून घेत आहोत. सरकारने मंत्रिमंडळात ठराव करुन कोल्हापूरच्या हक्काचे खंडपीठ द्यावे आणि कोल्हापूर परिसरातील जनतेला न्याय द्यावा अशी मागणी या आमदारांनी केली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, उल्हास पाटील आदी उपस्थित होते.