कोल्हापूर : राज्यातील फडणवीस सरकारने नुकतेच घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे राज्यातील विविध भागातील लाखो शेतकर्यांचा सातबारा कोरा होणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 54 हजारांपेक्षा अधिक शेतकर्यांनाही हा लाभ होणार असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. कोल्हापूर जिल्ह्यात दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेले 3700 शेतकरी असून त्यांना उर्वरित कर्ज भरावे लागेल तर 1 लाख 86 हजार नियमित शेतकर्यांना 25 टक्के प्रोत्साहन अनुदान मिळेल, असे सांगण्यात आले.
942 कोटींचे कर्ज थकीत
कोल्हापूर विभागातील तीन जिल्ह्यांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांच्या 1 लाख 74 हजार शेतकर्यांकडे पीककर्ज व मध्यम मुदतीचे असे 942 कोटींचे कर्ज थकीत आहे. यात सांगली जिल्हा 447 कोटी तर सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांकडे 303 कोटींची थकबाकी असल्याचे राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर सहकार विभागाने संकलित केलेल्या कर्जाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.