कोल्हापूर : आता सध्या महाराष्ट्रातील मंदिरातील भक्तांनी वातावरण तापवले आहे. त्याच धरतीवर आता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील वातावरणही तापवले आहे. अंबाबाई मंदिरातली पुजारी हटाव मोहीम आता आणखी तीव्र होणार आहे. याचाच भाग म्हणून अंबाबाई भक्त आज मातेला साकडे घालणार आहेत.
दहा दिवसांत प्रशानाने बैठक घेऊन या प्रश्नी निर्णय घ्यावा, अन्यथा मंदिराचे सर्व दरवाजे बंद करुन पुजार्यांना आत जाण्यास मज्जाव करणार असल्याचा पवित्रा भक्तांनी घेतला आहे. दरम्यान मंदिर परिसरात अंबाबाई भक्तांनी पुजार्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर गाभार्यात जाणार्या काही भक्तांना पोलिसांनी रोखले.