पुणे । प्रवाशांच्या सोयीसाठी कोल्हापूर-शिर्डी या मार्गावर सहा विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. 27 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या दरम्यान दर बुधवारी सायंकाळी सव्वाचार वाजता गाडी क्रमांक 01409 ही विशेष गाडी कोल्हापूरवरून शिर्डीकडे रवाना होणार आहे. ही गाडी शिर्डीला दुसर्या दिवशी सकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी पोहचेल. तसेच 28 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर दर गुरूवारी सकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी गाडी क्रमांक 01410 ही शिर्डीतून कोल्हापुरच्या दिशेने निघेल. ही गाडी त्याचदिवशी रात्री 9 वाजून 25 मिनिटांनी पोहचले. या मार्गावर हातकणंगले, मिरज, सांगली, कराड, सातारा, लोणंद, पुणे यासह दौंड, अहमदनगर, बेलापूर, पुणतांबा या स्टेशनवर गाडी थांबणार आहे.