कोल्हापूर-सातारा विकास सोसायट्यांच्या संचालक अभ्यास दौरा; सोसायट्यांना दिली भेट

0
जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी केले मार्गदर्शन
कामशेत:गावागावातील, तालुक्यांमधील विविध कार्यकारी सोसायट्या शेतकर्‍यांना कर्ज देत असतात. मात्र फक्त शेतीसाठी कर्ज न देता सगळ्या गोष्टींसाठी हे कर्ज दिले जाते. वडगाव मावळ तालुक्यातील विकास सोसायट्याही असे शेती संदर्भात कर्ज देतात. पण या पुढील काळात या सोसायट्यांनी व्यावसायिक विचार केला पाहजे. तसे केले तरच विकास सोसायट्या फायद्यात राहतील. कारण मावळ तालुक्यातील शेतीचे क्षेत्र कमी होत चालले आहे. त्यामुळे पीककर्ज व वेगवेगळी शेती कर्जे भविष्यात कमी होतील व विकास सोसायट्या अडचणीत येतील, असे मत कोल्हापूर-सातारा विकास सोसायट्यांच्या संचालक अभ्यास दौर्‍यात जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी व्यक्त केले.
व्यावसायिक दृष्टीकोन ठेवावा
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील यळगुड विकास सोसायटी व सातार्‍यातील कर्‍हाड तालुक्यातील रेठरे व कर्वे या सोसायट्यांची पाहणी केल्याने अनेक संचालकांच्या मनामध्ये आपल्याही विकास सोसायट्यांनी व्यावसायिक दृष्टीकोन ठेवावा. यळगुड संस्थेने दुग्धजन्य पदार्थ, बेकरी प्रोडक्टस, वेगवेगळे महिला उद्योग व रेठरे संस्थेने खत, बी-बियाणे, भात गिरणी, आयुर्वेदिक मेडिकल, ट्रॅक्टर, तसेच कर्वे संस्थेने मंगल कार्यालये, खाते बी-बियाणांसाठी वीत्त पुरवठा करीत उत्तम व्यवसाय करीत असल्याने मावळातील विकास सोसायट्यांच्या संचालकांची देखील व्यावसायिक दृष्टीकोन समोर ठेवण्याची मानसिकता निर्माण झाली आहे.