कोल्हेनगरात शेतकर्‍याच्या बंद घरात चोरी

0

कुलूप तोडून 85 हजारांचा मुद्देमाल लंपास; पोलीसात गुन्हा
जळगाव – शहरातील कोल्हेनगर परिसरातील शेतकर्‍याच्या घरात डल्ला मारून चोरट्यांनी 87 हजार 500 रूपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेबाबत तालुका पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरवाज्याचे कुलूप तोडून केला घरात प्रवेश
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील रिधूर येथील रहिवासी असलेले शेतकरी भगवान दशरथ कुंभार यांचे कोल्हेनगर परिसरात देखील घर आहे. कुंभार हे 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी गावी असलेल्या घरी गेले होते. चोरट्यांनी हिच संधी साधून मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाट फोडून 57 हजार 500 रूपयांचे दागिने व 30  हजार रूपये रोख असा ऐवज लंपास केला. सोमवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास शेजारी राहणारे उठल्यानंतर घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात  आला. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक कदीर तडवी करीत आहे.