कोल्हे गाव परीसरातील गोशाळेचा चारा पेटवला

0

वरखेडी। अंबे वडगाव येथुन जवळच असलेल्या पिंपळगाव हरेश्वर रेल्व स्टेशन ते प्रिंप्री रस्त्यावर असलेल्या बाफना कृषी व विद्याप्रसारक संस्था, संचलीत स्व.आर.एस. बाफना गोशाळा आहे. या गोशाळेत 151 गायी व 20 लहान वासर (कालवड) आहेत. या गोशाळेतील गायींकरीता रमेश बाफना यांनी पस्तीस ते च्याळीस ट्रँक्टर चाराकुट्टीचा साठा करुन ठेला होता.

परंतु सोमवार रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणाने चारा कुट्टीस पेटवुन दिल्याने या आगीत अंदाजे तीस ट्रँक्टर (दिड लाख) रूपये किंमतीचा चारा जळुन खाक झाला. रात्रीची वेळ असल्याने कोल्हे, अंबे वडगाव, पिंप्री, येथील ग्रामस्थांनी आगीचे डोंब पहाताच घटनास्थळी धाव घेऊन वरील प्रकार लक्षात येताच रमेशजी बाफना व अग्नीशामकदल पाचोरा यांना भ्रमणध्वनी वरुन आग लागल्याचे कळवले असता अग्नीशामकदलाने तात्काळ येऊन आग आटोक्यात आणली. यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.