यावल- तालुक्यातील कोळन्हावी येथील निवृत्ती भागा सोळंके (वय 58) यांनी गळफस घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली. गावाच्या बाहेरील खळ्यामधील छताच्या दांडीला सोळंके यांनी गळफास घेतला. भागवत दगा सोळंके यांनी यावल पोलिसात खबर दिली. तपास यावल पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुनील तायडे, विकास सोनवणे करीत आहे.