मुंबई । चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात कोळी बॉईज संघाने रूफिन्स फुटबॉल क्लब अ संघाचा 2-1 असा पराभव करत मुंबई शहर फुटबॉल संघटना आयोजित थर्ड डिव्हिजन स्पर्धेत विजयाचे तिन गुण मिळवले. स्ट्रायकर प्रतीक पाटील आणि विनय यादवने केलेल्या प्रत्येकी एका गोलामुळे कोळी बॉईज संघाने विजय निश्चित केला. कौस्तुभ सावंतने रूफिन्स संघासाठी गोल करत सामन्यात चुरस निर्माण केली होती. अन्य लढतीत अली अहमद विग्नेश नाइचर फुटबॉल क्लबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. विजेत्या विग्नेश संघाने फुटबॉल लिडर्स संघाचा 3-0 असा दणदणित पराभव केला. अलीने दोन आणि सुमित जाधवने एक गोल करत आपल्या संघाला विजयाचे तिन महत्वपूर्ण गुण मिळवून दिले. फैझान आणि सोहेल शेखच्या गोलांच्या जोरावर युनायटेड फुटबॉल क्लब आरसीएफ युथ कॉन्सिल संघाचा 2-0 असा पराभव केला.