मुरुड | पावसाचा जोर कमी झालाय आणि नारळी पौर्णिमाही आठवड्यावर येऊन ठेपलीय. आता कोकण, मुंबईसह राज्यभरातील सागरी कोळीवाड्यांत होड्या मासेमारीसाठी सज्ज होऊ लागल्या आहेत. कुठे नावेची डागडुजी कर, जाळ्यांची दुरुस्ती कर, कुठे रंगरंगोटी कर, अशी कामे सध्या सुरु आहेत. पूर्वीच्या काळी जाळी विणताना अभंग, गाणी, पौराणिक कथांचे सामूहिक पठण केले जात असे. आता याच काळात कोळीबांधव एकवीरा, खंडोबा, पंढरपूर, शिर्डी आणि आपल्या इच्छित देवदेवतांच्या दर्शनाला जाऊन भक्तिभावाने दर्शन करतात.
01/06 – पासून नारळी पौर्णिमेपर्यंत मासेमारी बंद
720 – किमी राज्यात सागरकिनारा
18,00,000 – मच्छीमार महाराष्ट्रात
1,20,00,000 – महाराष्ट्रीय खातात मासे
3,50,00,000- प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार