भुसावळ : कोळी समाजातील जनजागृतीसाठी आणि समाजातील जुन्या परंपरा, चालीरिती, सामाजिक मुल्ये यांची जाण करुन देण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक मार्गदर्शन शिबीर, वाढत्या तांत्रिक युगात आपण कसे वावरावे. या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आणि विशेष जात प्रमाणपत्रासाठी व आरक्षणासाठी शाळा, महाविद्यालयामध्ये समाजातील मुलींना जास्तीत जास्त शासकीय योजना, सेवा, सरकारी उच्च शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी ही संघटना अथक प्रयत्नातून लढा देवून लाभ मिळवून देणार आहे. याचीच पायाभरणी म्हणून संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी कंडारी येथील रहिवासी रुपाली सुर्यवंशी तर जिल्हा उपाध्यक्षपदी सिमा तायडे यांची निवड करण्यात आली आहे.
प्रथमच महिलांची कार्यकारिणी तयार
प्रत्येक तालुक्यात महिलांची व गावातसुध्दा महिलांची कार्यकारिणी लवकरच तयार केली जाणार आहे. समाजात प्रथमच महिलांची कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र समाजात कौतुक केले जात आहे. ही कार्यकारिणी भुसावळ येथील सोमेश्वर नगर परिसरात गठित करण्यात आली. याप्रसंगी मीना सपकाळे, चंचल सुर्यवंशी, कविता सोनवणे, उषा कोळी, ज्योती पाटील, वर्षा सोनवणे, दिपाली सपकाळे, माधुरी कोळी आदी महिलांची उपस्थिती होती.