नागोठणे । होलिकोत्सव सणाचे निमित्त साधून येथील बाल गणेश क्रीडा मंडळ आणि कोळी समाजाच्या संयुक्तविद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना – काँग्रेस आघाडीचे नवनिर्वाचित सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांचेसह आघाडीचे 11 विजयी आणि 6 पराभूत अशा एकूण 18 जणांचा कोळीवाड्यात घेण्यात आलेल्या एका विशेष समारंभात गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यमान सरपंच प्रणय डोके, उदंड रावकर, शब्बीर भिकन, असगर मांडलेकर यांचेसह संतोष वाघमारे, श्याम पाटील, प्रदीप वाघमारे, बाबू कोळी, पांडुरंग कोळी, बाबू वाघमारे, गणेश पाटील, सतीश पाटील, विष्णू वाघमारे, मंगेश वाघमारे, दिनेश पाटील, दीपक पाटील, बळीराम कोळी तसेच समाजातील महिलावर्ग आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी सुरेश जैन, कल्पना टेमकर, भक्ती जाधव, मोहन नागोठणेकर, मंगी कातकरी, रुपाली कांबळे, विद्यमान उपसरपंच शैलेंद्र देशपांडे, रंजना राऊत, मीनाक्षी गोरे, सुप्रिया महाडिक, ज्ञानेश्वर साळुंखे या विजयी तसेच पराभूत झालेले संजय वाघमारे, पूनम इप्ते, इम्रान पानसरे, शाहीन कुरेशी, शबाना मुल्ला, मीनाक्षी रावकर यांचा मान्यवरांचे हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
मागील 5 वर्षात केलेल्या विकास कामांची जाण ठेेवून जनतेने आघाडीला पुन्हा निवडून दिले असून विकासाची गंगा अशीच अव्याहतपणे चालू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली. पराभूत झालेले सहाही उमेदवार थोडक्या मतांनी पडले असले तरी निश्चितच त्यांनी झुंज दिली असल्याने त्यांच्या कामगिरीची जाण ठेवून त्यांचा हुरूप असाच कायम राहण्यासाठी मंडळाने त्यांचासुद्धा सत्कार केला असल्याचे श्याम पाटील यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.