भुसावळात कोळी समाजाच्यावतीने विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव
भुसावळ- शहरातील कोळी समाज मंगल कार्यालयात समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुरूवारी कोळी समाजाच्यावतीने मुंबईचे आमदार रमेश पाटील, चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
जळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, जिल्हा परीषद सदस्य सरला कोळी, मुक्ताईनगर पंचायत समितीच्या सभापती शुभांगी भोलाणे, उपसभापती वंदना उन्हाळे, भुसावळ पालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती अनिता सपकाळे, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, सेवानिवृत्त उपसंचालक रमेश पवार, यावल नगराध्यक्षा सुरेखा कोळी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. या मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमास दिलीप सुर्यवंशी, विश्वनाथ तायडे, बी.टी.बाविस्कर, प्रभाकर सोनवणे, भीमराव कोळी, गिरधर कोळी, गोपाळ तायडे, लखीचंद बाविस्कर, डॉ.दिवाकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यांनी घेतले यशस्वितेसाठी परीश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वसंत सपकाळे, बाळू कोळी, रवींद्र बाविस्कर, दीपक सोनवणे, भागवत सपकाळे, चंद्रकांत सुर्यवंशी, महारू कोळी, हेमंत सपकाळे, धर्मा कोळी, शांताराम कोळी, विजय तावडे, आर.डी.सोनवणे, प्रदीप सपकाळे, व्ही.टी.मोरे, बन्सी मोरे, विजय रायपुरे, सुकदेव चित्ते, शशी सपकाळे, नारायण कोळी, नारायण भोलाणकर, चंद्रकांता सपकाळे, मुकेश कोळी, विकास सैदाणे आदींनी परीश्रम घेतले. चंद्रकांत सुर्यवंशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन कोळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर धोंडू सोनवणे व वधू-वर परीचय समितीचे अध्यक्ष दत्तायय धर्मा सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.