भुसावळ । आदिशक्ति एकविरा बहुउद्देशीय संस्थेेमार्फत आदिवासी कोळी समाजातील जिल्हाभरातून निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा पंचायत समिती सभागृहात पार पडला. याप्रसंगी संंस्थेचे अध्यक्ष नारायण कोळी, उपाध्यक्ष सुनय कोळी, सचिव प्रदिप सोनवणे व पदाधिकार्यांच्या हस्ते सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यांचा झाला सत्कार
यामध्ये जिल्हा परिषदेत निवडून आलेले प्रभाकर सोनवणे, वैशाली तायडे, निलेश पाटील, सरला कोळी, पवन सोनवणे, आत्माराम कोळी, किर्ती चित्ते तर पंचायत समितीमध्ये वंदना उन्हाळे, शुभांगी भोलाणे, लता कोळी, जनाबाई सोनवणे, चावदस कोळी यांचा सत्कार झाला.
यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण संचालक डॉ. श्रीधर साळुंके, अॅड. विजय लटंगे, सभापती राजेंद्र चौधरी, अॅड. वसंत भोलणकर, अॅड. महेश भोकरीकर, अॅड. रुपाली भोकरीकर, मुकेश सोनवणे, भगवान सपकाळे, नरेंद्र सपकाळे, अजय कोळी, आर.एम. भोकरीकर, एस.ए. भोई, रवी बोरसे, सुनिल कोळी, शालिग्राम पाटील, मुरलीधर पाटील, तोताराम भोलाणे, सुरेश कोळी आदी उपस्थित होते.