कोळी समाजातील लोकप्रतिनिधींचा सत्कार

0

जळगाव । दर्यासागर सामाजिक संस्थेतर्फे कोळी समाजातील सामाजिक लोकप्रतिनिधी तसेच समाजसेवक अधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. जळगाव रोटरी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून अशोक कांडेलकर, समाजकल्याण सभापती प्रभाकर गोटू सोनवणे दर्यासागर संस्थेचे अध्यक्ष भगवान सपकाळे, प्रकाश नन्नवरे, बी.आर.बाविस्कर, डॉ.एस.बी.सोनवणे, डॉ.एस. बी. कोळी, के.आर.तायडे, दिलीप सूर्यवंशी, उषा बाविस्कर, गोपाळ तायडे, गिरधर कोळी, आर.जी.राणे,यांच्या सह समाजातील प्रमुख मंडळी उपस्थित होते.

कार्यक्रमात यांचा झाला सत्कार
मान्यवरांचा यशोचित सत्कार करण्यात आला. त्यात प्रभाकर नारायण सोनवणे, समाज कल्याण सभापती प्रभाकर गोटू सोनवणे, आत्माराम कोळी, सरला कोळी, वैशाली तायडे या जिल्हा परिषद सभासदांचा सत्कार करण्यात आला.तसेच पं.स.सभापती शुभांगी भोलाणे, रजनी सोनवणे (सभापती पंचायत समिती एरंडोल), वंदना उन्हाळे, ललिता कोळी, मालूबाई कोळी, निर्मला कोळी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. समाज कल्याण सभापती प्रभाकर गोटू सोनवणे यांनी कोळी समाजासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत असून याचा फायदा समाज बांधवानी घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. समाज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रगती पथावर असून विविध क्षेत्रात समाज बांधव देश सेवा बजावीत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे ते म्हटले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसत्तठी नरेंद्र सपकाळे, पुरुषोत्तम सपकाळे, योगेश कोळी, रोहिदास सोनवणे, लिलाधर सोनवणे, एल.एस.तायडे, हिराबाई सपकाळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एल.एस.तायडे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रदीप सोनवणे यांनी केले.