कोळी समाज वधू- वर मेळाव्यात 275 युवक-युवतींचा परिचय

0

जळगाव । जग आता बदलत आहे. त्याच प्रमाणे समाजात देखील दिवसेदिवस बदल होत आहे. तसेच मुले मुली शिकत आहे. नोकरीवाला मुलगा हवा पाहीजे अशी प्रत्येक युवतीची इच्छा असल्याने ही मानसिकता बदलविणे आवश्यक असल्याचे मत माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी व्यक्त केले.कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय आदिवासी कोळी समाज संघटना, श्रही माता मनुदेवी बहुद्देशीय संचलित राष्ट्रीय आदिवासी कोळी समाज वधू-वर परिचय व सामूहिक विवाह समिती यांच्या संयुक्त विद्यामाने राष्ट्रीय आदिवासी कोळी समाजातील वधू-वर परिचय मेळावा आज सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी कोळी महासंघाचे युवाध्यक्ष चेतन पाटील होते. सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील, माजी आ. सुरेशदादा जैन, महापौर ललित कोल्हे, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, हभप विष्णू महाराज, सरपंच सरस्वती सोनवणे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, मुख्यधिकारी प्रभाकर सोनवणे, डिवायएसपी प्रताप बाविस्कर, गणेश सोनवणे, प. स. सदस्य चावदस कोळी, नाना कोळी, शिवराम तायडे, प्रकाश गुजराथी, महेंद्र शाह, डॉ. दिवाकर पाटील, भावेश कोळी, शिरीष बाविस्कर, मुन्ना सोनवणे, रवि ठाकरे, कैलास बाविस्कर, प्रदिप सोनवणे, सुनय कोळी, रामचंद्र कोळी, पीएसआय भगवान कोळी, सुभाष कोळी आदी.

मान्यवरांचे मनोगत
कोळी समाजातील वधू-वर साठी ऑनलाईन नोंदणी वेब पोर्टल़चे उद्घाटन करण्यात आले. सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, चेतन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 30 जिल्ह्यातून समाजातील वधू-वर आणि त्यांचे पालक उपस्थित होते. 275 युवक युवतींनी परिचय करुन दिला. कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष कडू कोळी, नामदेव सोनवणे, भगवान सपकाळे, संदीप कोळी, सुभाष सोनवणे, राजू सोनवणे, भैय्या सोनवणे, दीपक सोनवणे, मनोज सपकाळे, खेमचंद सपकाळे, विशाल सपकाळे, किरण सोनवणे, प्रमोद बाविस्कर, गोपाल सपकाळे, निलेश तायडे चंद्रकांत सपकाळे यांनी परिश्रम घेतले