कोविड रुग्णालयांकडेही वीजबिलाची थकबाकी

 
धुळे : कोविड रुग्णालय असलेल्या दोन शासकीय रुग्णालयांकडे जवळपास १ कोटी १५ लाख वीजबिल थकीत आहे.
    धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे १ कोटी ४ लाख ५२ हजार ७०५ रुपये तर शिरपूर येथील

शासकीय रुग्णालयाकडे ९ लाख ८६ हजार ५०८ रुपये वीजबिल थकले आहे. दोन्ही धुळे रुग्णालयाने मार्चमध्ये काही प्रमाणात बिल भरले होते तसेच २९ ऑक्टोबरला केवळ १८ लाख ४३ हजार ९० रुपयांचे एवढेच बिल भरले आहे. तसेच शिरपूर रुग्णालयाने गेल्या ऑक्टोबरला काही प्रमाणात बिल भरून या वर्षीच्या १६ सप्टेंबरला केवळ २ लाख ६६ हजारांचे बिल भरले आहे. दोन्ही रुग्णालयांच्या प्रशासनाकडे महावितरणने वारंवार पाठपुरावा करूनही वीजबिलांची संपूर्ण थकबाकी भरली नसल्याचे महावितरणने म्हटले आहे.