भुसावळ : राज्यामध्ये प्रशासन नावालाच अस्तित्वात आहे. पीपीई कीट, हॉस्पिटलची निर्मिती, राज्यातील सर्व क्षेत्रातल्या लोकांना एकत्र करून एक चांगलं नेतृत्व देऊन कोविडच्या विरोधात लढण्याकरिता बळ देणे असेल अशा सर्वच बाबतीत राज्य सरकारचे नेतृत्व हे मोठ्या प्रमाणावर अपयशी ठरले आहे. राज्य सरकार शेतमाल खरेदी करत नाही. शेतकर्यांना बिनव्याजी कर्ज तातडीने देणे, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानीची भरपाई सुद्धा देण्याची आवश्यकता असल्याची मागणी शहर व ग्रामीण भाजपा पदाधिकार्यांनी तहसील प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, तालुकाध्यक्ष भालंचद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती सुनील महाजन, शहर सरचिटणीस पवन बुंदेले, अमोल महाजन, प्रा. प्रशांत पाटील, दिलीप कोळी, अतुल झांबरे आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते..