कोहलीकडून आणखी एक विश्वविक्रम; १९ हजार धावांचा टप्पा ओलांडला

0

सिडनी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज कर्णधार विराट कोहलीने जास्त धावा केल्या नाहीत. पण तरीही कोहलीने एक नवा विश्वविक्रम रचला आहे. हा विश्वविक्रम रचताना कोहलीने सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि रिकी पॉन्टिंग या महान फलंदाजांना मागे टाकले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ५९ चेंडू तीन चौकारांच्या मदतीने २३ धावा केल्या. यासोबतच कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १९ हजार धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. कोहलीने या सर्वात जलद १९ हजार धावा करताना सचिनला मागे टाकले आहे. सचिनला सर्वात जलद १९ हजार धावा करण्यासाठी ४३२ डाव खेळावे लागले होते. पण कोहलीने ३९९ डावांमध्येच हाच पराक्रम करून दाखवला आहे.