मुंबई । भारत ऑस्ट्रेलियाविरूध्द कसोटीचे सामने सुरू आहे.पुणे येथे भारताचा लाजीरवाणा पराभवा नंतर बगळूरू मध्ये विजय मिळवून भारताने मालिकेत बरोबरी केली. मालिकेत बरोबरी केली असली तरी भारतीय फलंदाज चितेंची बाब ठरली आहे. या मालिकेत चार डांवामध्ये विराटने 40 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहलीची सर्वात सुमार कामगिरी आहे. त्यामुळे कसोटीतील सरासरी 50 च्या खाली घसरली आहे. भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया याच्यातील कसोटी सामने अजुन रंगतदार होणार याची चिन्हे दिसू लागले आहे.या दोन्ही सामन्यात संघात बरोबरी झाली आहे.पहिल्या व दुसर्या भारतीय सामन्यात भारतीय फलंदाजांची कामगिरी समाधानकारक नव्हती. पहिल्या सामन्यात गोलंदाजी व फलंदाजी सुमर ठरली.
आता पुढील कसोटीत कोहलीला सूर गवसणार का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. हा खेळ आकड्यांचा चेतेश्वर पुजाराने डिसेंबर 2014 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक ठोकले. चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 10 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 829 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
एका अर्धशतकाचा समावेश
तर दुसर्या कसोटीत गोलंदाज आर.अश्विन भारताचा विजयाचा शिल्पकार ठरला. भारतीय गोटात चिंतेचा विषय आहे तो भारताचा कर्णधार विराट कोहलीला अजूनही सूर गवसलेला नाही. विराटने दोन कसोटीतील चार डावांमध्ये फक्त 40 धावाच केल्या. यापूर्वी विराटने 2014 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अशी सुमार कामगिरी केली होती. विराटने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 10 डावात 13.40च्या सरासरीने फक्त 134 धावा केल्या होत्या. कोहलीने कसोटीत 49.90 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. कर्णधार झाल्यावरही विराटने फलंदाजीतही धडाकेबाज कामगिरी केली होती. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विराटला अजूनही अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहली आत्तापर्यंत सहा कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 36 च्या सरासरीने 324 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहेत.
63 धावा देत सात विकेट घेतल्या
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने दुस-या कसोटीत पाचव्या विकेटसाठी केलेली 93 धावांची भागीदारी ही मालिकेत पाचव्या विकेटसाठीची आत्तापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. यापूर्वी डेव्हीड वॉर्नर आणि रेनशॉ या दोघांनी पुणे कसोटीत पाचव्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली होती. रविंद्र जाडेजाने दुस-या कसोटीत 63 धावा देत सात विकेट घेतल्या. कसोटीतील ही त्याची दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. जाडेजाने यापूर्वी इंग्लंडविरुद्ध चेन्नईत 48 धावांमध्ये सात विकेट घेतल्या होत्या. भारताच्या डावखु-या फिरकी गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. जाडेजापूर्वी 1969 – 70 मध्ये बिशनसिंग बेदी यांनी 98 धावांमध्ये सात विकेट घेतल्या होत्या.