कोहलीच्या निर्णयावर बॉयकॉटचे प्रश्नचिन्ह

0

मुंबई । भारताचा चॅम्पियन ट्रॉफीत झालेल्या पराभवानंतर इंग्लंडचा महान क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट याने विराट कोहलीच्या निर्णयावर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. जी खेळपट्टी फलंदाजासाठी चांगली होती.त्यादिवशी वातावरण ही ढगाळ नव्हते. त्यावेळी कोहलीने गोलंदाजीचा निर्णय घेतला हे त्याच्याकडून अपेक्षित नव्हते.जरी तुम्ही नाणेफेक होण्याआधी जरी बातचित केली असली तरी शेवटी निर्णय हा कर्णधारच घेत असतो.पाकिस्तानला गवत असलेल्या पिचवर फलंदाजीला निमंत्रण देवून त्याने स्वत:च्या पायावर धोडा मारून घेतला.

भारताने नाणेफेक जिकली होती.त्यामुळे टारगेट चेंस करण्यापेक्षा टारगेट देवून त्यांना लक्षाच्या आत गारद करून विजयाचा झेडा रोवयाची संधी भारताकडे होती.असे असतांना भारताच्या कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजी घेणे हीच मोठी चुक ठरली.यामुळेच अंतिम सामन्यात पहिली फलंदाजी करणार्‍या पाकिस्तानी संघाने भारतीय आक्रमणातली हवाच काढून टाकली होती. सलामीवीर फखार झमानने शतकी खेळी करत सर्व भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला होता. ज्यामुळे भारताला 339 धावसंख्येचे टार्गेट मिळाले होते. मात्र या धावसंख्येचा पाटलाग करताना भारताचे फलंदाज ढेपाळले होते.

यानंतर विराट कोहलीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यात भारतीय संघ 5 वन-डे आणि एक टी-20 सामना खेळणार आहे. भारताचा वेस्ट इंडीजविरुद्ध पहिला सामना येत्या शुक्रवारी खेळवला जाणार आहे. त्यामुळे जेफ्री बॉयकॉट यांचा सल्ला विराट कोहली आणि त्याची टीम इंडीया आगामी वेस्ट इंडीज दौर्‍यात कसा काय उपयोगात आणते ते पहावे लागेल.