कोहलीला सोडावे लागणार ओएनजीसीचे मॅनेजरपद!

0

नवी दिल्ली । टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला ऑईल अँड नॉचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात ओएनजीसीचे मॅनेजरपद सोडण्याचे आदेश बीसीसीआयने दिले आहेत. लोढा समिती विरुद्ध बीसीसीसीआय या गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या वादाचा फटका आता भारतीय संघाच्या क्रिकेटपटूंना बसत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. बीसीसीसआयवर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या प्रशासकीय समितीने याआधीही सर्व क्रिकेटपटूंसाठी सरकारी किंवा खासगी नोकरी सोडण्याचे आदेश दिले होते.

खेळामध्ये आर्थिक हितसंबंध नको
‘कॉन्फिलक्ट ऑप इस्टेट’च्या मुद्यावरून यापूर्वी सुनील गावस्कर, राहुल गावस्कर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यासारखे दिग्गजांनाही अडचणीचा सामना करावा लागला होता. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांशी करारबद्ध असलेल्या क्रिकेटर्सना त्या नोकर्‍या सोडण्यास सांगा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला दिला होता. खेळामध्ये आर्थिक हितसंबंध आड येऊ नयेत याकरता हा एक नियम आहे.

100 खेळाडूंच्या नोकरीवर गदा
कोहलीव्यतिरीक्त वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि इशांत शर्मा हे खेळाडू देखील ओएनजीसी कंपनीत कामाला आहेत. कोहलीव्यतिरीक्त बीसीसीआयने अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा अशा जवळपास 100 खेळाडूंना आपल्या सरकारी किंवा खासगी नोकरी सोडण्याबद्दल आदेश दिले असल्याची माहिती आहे. यामुळे या सर्व खेळाडूंना नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे. या निर्णयामुळे पुन्हा खेळाडू व बीसीसीआयमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.