मुंबई । भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्शपदाची निवड आणखी लांबणीवर पडली आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य सौरव गांगुली यांनी 10 जुलै रोजी संघाच्या प्रशिक्शकाचे नावावर शिक्कामोर्तब करण्याचे जाहिर केले होते. मात्र मुंबईत सोमवारी झालेल्या क्रिकेट सल्लागार समितीची बैठक आणि प्रशिक्शक पदाच्या उमेदवारांच्या मुलाखतीनंतर समितीला नाव ठरवण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत पाहिजे असे सौरव गांगुली यांनी सांगितले. याशिवाय निर्णयासंदर्भात एकमत होण्यासाठी कर्णधार विराट कोहलीशी चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचेही गांगुलींनी यावेळी स्पष्ट केले. अनिल कुंबळेनी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर प्रशिक्शकपद सोडले होते. कोहलीशी असलेल्या वादामुळे कुं बळेने पद सोडल्याची चर्चा होती. स्वत: विराट कोहलीने मात्र याबाबत काही भाष्य करण्यास नकार दिला होता.
विराटकडून शिफारस नाही.
रवी शास्त्री यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केल्यावर कोहलीची त्यांच्या नावाला पसंती असल्याचे जगजाहिर झाले होते. अर्ज दाखल करण्यासाठी क्रिकेट सल्लागार समितीतील सचिन तेंडुलकर यांनी शास्त्रींची समजुत घातली होती. त्यामुळे शास्त्री प्रबळ दावेदार समजले जात आहे. समितीच्या बैठकिनंतर विराटने कोणाची शिफारस केली होती का? असा प्रश्न गांगुलींना विचारण्यात आला. त्यावेळी कोहलीने कोणाचे नाव सुचवले नाही असे गांगुलींनी स्पष्ट केले.
सेहवागची दोन तास मुलाखत
मागील घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुलाखती रद्द करण्याकडे बीसीसीआयचा कल होता. पण सोमवारी उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. विरेंद्र सेहवागची मुलाखत तब्बल दोन तास सुरु होती.