मुंबई। भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक फेसबुक फॉलोअर्सच्या यादीत सलमान खानसह सचिन तेंडुलकर, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रासारख्या प्रसिद्ध सेलिबटींना मागे टाकत अव्वल स्थान मिळवलेय. फेसबुकवर विराट कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या 35,725, 719 इतकी झालीये. याआधी या यादीत दबंग खान सलमानचा नंबर होता. मात्र विराटने त्यालाही मागे टाकलेय. या यादीत सलमान दुसर्या स्थानावर तर दीपीका आणि प्रियंका अनुक्रमे तिसर्या आणि चौथ्या स्थानी आहेत.