नवी दिल्ली-भारत आणि वेस्ट इंडीज संघात रविवारी झालेल्या एकदिवशीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने दमदार खेळी केली. त्याला सामनावीर म्हणूनही घोषित करण्यात आले होते. यावेळी बोलतांना कोहलीने मला खेळाचा आनंद घेण्यासाठी काही वर्षेच शिल्लक असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीची चर्चा सुरु आहे. मात्र विराट कोहली यांच्या बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी विराट ४० वर्षाचा होईल तोपर्यंत निवृत्त होणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे. सध्या कोहली २९ वर्षाचा आहे. अजून तो खूप वर्ष खेळू शकतो असेही शर्मा यांनी सांगितले आहे.
विराट कोहलीमध्ये धावा करण्याची मोठी भूक आहे ती भूक अजून १० वर्ष तरी शमणार नाही असा विश्वास प्रशिक्षक शर्मा यांनी व्यक्त केला आहे.