मुंबई : ‘कोहिनूर स्केअर’ प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह उन्मेष जोशी, बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांची चौकशी सुरु आहे. आज चौकशीचा तिसरा दिवस असून आजही त्यांची कसून चौकशी होणार आहे. दरम्यान उद्या २२ रोजी राज ठाकरे यांची परीक्षा असून त्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
उन्मेष जोशी हे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे पुत्र आहेत. काल उन्मेष जोशींची ईडीने सलग आठ तास मॅरेथॉन चौकशी झाली.