शिंदखेडा । सख्खा काकाच लैंगीक शोषणाचा प्रयत्न करत असल्याने आपल्या पित्यास तक्रार केली असता, पिता व कुटंबिंयानी मुलीचा मानसिक व शारीरीक छळ केल्यामुळे मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील मेथी या गावात घडली. दरम्यान पुरावा नष्ट करण्यासाठी कुुंटबिंयानीच मुलीच्या प्रेताची तत्काळ विल्हेवाट लावली. याप्रकरणी मयत मुलीच्या आईने शिंदखेडा पोलीसांना दिलेल्या तक्रारीनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनूसार मयत मुलगी व तिचा भाऊ शुभम हे दोघेहि वडील भावराव देवचंद आगळे रा.मेथी यांच्याकडे राहत होते. कौटूंबीक वादामुळे आई दिपाली हि आपले वडील उत्तम बैसाणे यांच्याकडे शहादा येथे गेल्या दहा बारा वर्षापासुन राहत आहे. दरम्यान मुलीच्या आत्महत्येची घटना कळताच आई दिपाली बैसाणे यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशनला मुलीने आत्महत्येस कुटंबीयांनी प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
प्रेताचे पुरावे नष्ट करण्याप्रकरणी शिंदखेडा पोलीसात 9 जणांवर गुन्हा
पीडीत मुलीने आपल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड झाल्यास आपणास अटक होईल या भितीपोटी कुटूंबियांनीच आपल्या मुलीचा दफनविधी उरकून टाकल्याचे आईला समजताच शिदंखेडा पोलसात 9 जण भावराव देवचंद आगळे वडील, ध्रुपदाबाई देवचंद आगळे आजी, दगा देवचंद आगळे काका, इंदूबाई आगळे काकू, शाहणा देवचंद आगळे काका, रेखा आगळे काकू, सतीश दगा आगळे चुलत भाऊ, सचिन मधुकर सोनवणे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शिंदखेडा पोलीसांनी जलद तपास चक्रे फिरवून 9 पैकी 7 जणांना गजाआड केले आहे.
काका व कुटूंबियाचाही होता मुलीला त्रास
पिडीत मयत मुलीच्या काका दगा उर्फ अण्णा देवचंद आगळे व सचिन मधुकर सोनवणे यांची तिच्यावर वाईट नजर होती. मुलीच्या अंगाला नको त्या ठिकाणी स्पर्श करायचा प्रयत्न हे लोकं करत होते. दरम्यान मुलीने हा प्रकार तीचे वडील भावराव देवचंद आगळे व परिवारातील लोकांकडे कैफियत मांडली. परंतू जाब विचारण्या ऐवजी उलट बापाने व घरच्यांनी मिळून मुलीला त्रास देणे सुरू केले. त्यामुळे अखेर त्रासाला कंटाळून मुलीने 15 मार्च रोजी आत्महत्या केली.