कौटुंबिक हिंसाचार : लूडोमध्ये हरल्याने पतीने तोडला पत्नीच्या पाठीचा कणा

0

बडोदा – लॉकडाऊनमध्ये विरंगुळा म्हणून ऑनलाईन लूडो खेळतांना पत्नीकडून वारंवार हरल्यानंतर एका दाम्पत्यामध्ये भांडणाला सुरूवात झाली. भांडण इतकं वाढले की पतीने पत्नीला मारहाण करत तिच्या पाठीचा कणा तोडला, अखेर पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुजरातच्या बडोद्यात ही घटना घडली.
‘१८१ अभयम हेल्पलाइन’मध्ये आलेल्या तक्रारीनंतर समोर आलेल्या घटनेत, विरंगुळा म्हणून पती व पत्नी लूडो खेळत होते मात्र सलग तीन-चार गेममध्ये वेळेस पत्नीकडून हरल्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नीसोबत वाद घालायला सुरूवात केली. दोघांमधील वाद नंतर इतका शिगेला पोहोचला की, त्याने पत्नीला बेदम मारहाण सुरू केली. या मारहाणीत तिच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. नंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर पत्नीने पतीच्या घरी जाण्यास नकार देत माहेरी जाण्याची तयारी केली होती. पण, दोघांच्या समुपदेशनानंतर पतीने पत्नीची माफी मागितली. त्यामुळे पत्नीने त्याच्यासोबत पुन्हा घरी जाण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर पत्नीला पुन्हा मारहाण न करण्याची ताकीद पतीला देण्यात आली, अशी माहिती ‘१८१ अभयम हेल्पलाइन’कडून देण्यात आली आहे.