वरखेडी । गणेशोत्सव व बकरी ईद निमिताने जळगाव जिल्हा पोेलीस दल, पिंपळगाव (हरे.)तर्फे कौमी एकता क्रिकेट स्पर्धा सोमवार 4 सप्टेंबर रोजी आयोजीत करण्यात आली होती. सदर स्पर्धेचे उद्घाटन मा. उपविभागीय पोलस अधिकारी, पाचोरा केशव पातोेंड व तहसीलदार कापसे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक पाटील. कोलसिंग देशमुख़. ईस्माइल तांबोळी, पत्रकार मंडळी व परीसरातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते. पिंपळगाव हरे- राजूरी, वरख़ेडी, कुव्हाड, वाडी , शेवाळे, शिंदाड लोहारा भोकरी ह्या टिमांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत क्रिकेट प्रेमींनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला होता.
सपोनि संदीप पाटील यांची हॅट्रीक
सदर क्रिकेट स्पर्धेत जे.एम.सी.टी शिंदाड टीमने जिंकली व प्रथम पारितोषिक प्राप्त केले. ताज क्रिकेट संघ पिंपळएाव हरे. य टिमला द्वितीय पारीतोषीक व जे.एम.सि.टी शिंदाड संघाचे चंदक्रात चौधरी ते मालिकवराचा पुरस्कार मिळाला. यास्पर्धेत सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप पाटील, पोलिस सहाय्यक नाईक आशिष शेळके यांनी चांगला खेळ खेळले. सपोनि संदीप पाटील यांनी हॅट्रीक घेतली. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन संदिप पाटील, आशिष शेळके, कर्मचारी विनोद पाटील, किशोर राठोड, अरुण राजपुत, शिवनारायण देशमुख, व गावातील तरुण खेळाडु रवि गिते, संतोष हटकर, परेश पाटील, सुर्यवंशी सर, जावेद पठाण, वसिम खान, रउफ तडवी, राउसाहेब, भाउसाहेब तसेच गावतील खेळाडूंनी परीश्रम घेतले.