‘कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याची गरज’

0

हडपसर । शिक्षणाच्या परिघाबाहेरील विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेत आणले पाहिजेत. ग्रामीण भागातील व तळागाळातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे पारंपरिक शिक्षणाला फाटा देऊन कौशल्यपूर्ण शिक्षण देणे नव्या युगाचा कौशल्ययुक्त विद्यार्थी घडवण्यासाठी बीएस्सी इन फॅसिलिटी सर्व्हिसेससारख्या गोष्टींची आज खरी गरज असल्याचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे कुलगुरू इ. वायुनंदन यांनी दिले.

रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्था, सातारा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व बीव्हीजी इंडिया यांच्या वतीने बीएस्सी इन फॅसिलिटी पदवी अभ्यासक्रम उद्घाटन वायुनंदन यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. अनिल पाटील, हणमंतराव गायकवाड, डॉ. जयदीप निकम, डॉ. राजेंद्र वडनेरे आदी उपस्थित होते. गायकवाड म्हणाले, 2020 साली भारत हा सर्व तरुणांचा देश असणार आहे. अशा तरुणांना काम द्यावयाचे असेल तर भारताबरोबर परदेशात नोकरी मिळवायची असेल तर चांगली कौशल्य आत्मसात करावी लागतील. डॉ. अनिल पाटील म्हणाले, समाजाची गरज ओळखून शिक्षण दिले पाहिजे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, आयटी, उद्योग आणि व्यवसाय यांचे सहसंबंध असलेले शिक्षण रयत शिक्षण संस्था या माध्यमातून देत आहे. प्रास्ताविक भाऊसाहेब कराळे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. डॉ. शकुंतला सावंत, प्रा. नम्रता मेस्त्री यांनी केले तर प्राचार्य बी. टी. जाधव यांनी आभार मानले.