कौशल्यासाठी भाषेची गरज नाही ते आत्मसात करण्याची गरज

0

प्रा.डॉ.एस.एन.भारंबे ; नाहाटा महाविद्यालयातील भूगोल सप्ताह अंतर्गत ‘भू सवक्षण आणि रोजगार संधी’ या विषयावर व्याख्यान

भुसावळ- भूगोलाचा विद्यार्थी किंवा रोजगाराच्या शोधात असलेल्या प्रत्येक उमेदवाराने आपल्या गरजा जर नियंत्रित ठेवल्या तर आपण कोणताही रोजगार कर्तव्य म्हणून करू शकतो तसेच प्रयत्न आणि एकाग्रता आपल्या अंगी जर असली तर आपण रोजगारमध्ये यथोच्च शिखर गाठू शकतो. तसेच भू सर्वेक्षणामध्ये असंख्य रोजगार उपलब्ध असून त्यांना प्राप्त करण्यासाठी आपल्याजवळ कौशल्य पाहिजे. कौशल्याला कोणतीही भाषा नसते ते आत्मसात करावे लागते. कौशल्य ही जन्मजात देणगी नसते तर ती व्यक्त करावी लागते. रोजगारासाठी कोणतेही काम हलके नाही याची जाणीव आपल्याला असावी, असे मत मु.जे. महाविद्यालयचे प्रा.डॉ.एस.एन.भारंबे यांनी येथे व्यक्त केले. भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील भूगोल शास्त्र मंडळ आयोजित भूगोल सप्ताह अंतर्गत गुरुवारी ‘भू सर्वेक्षण आणि रोजगार संधी’ या विषयावर प्रा.भारंबे यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

यांची होती प्रमुख उपस्थिती
भूगोल सप्ताह सहसमन्वयक प्रा.अजय तायडे, भूगोल विभाग प्रमुख प्रा.व्ही.पी.लढे, भूगोल सप्ताह समन्वयक प्रा. प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयातील प्रा.डॉ.विलास महिरे, प्रा.डॉ.अजय क्षिरसागर, प्रा.विकास वाघुळदे, प्रा.शंकर पाटील, प्रा.उषा कोळी, प्रवीण पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपक पाटील तर आभार काजल वायकोळे व प्रमुख पाहुण्यांचा परीचय भूगोल शास्त्र मंडळ विद्यार्थी सचिव शुभम पाटील यांनी करून दिला. प्रास्ताविक चारू वायकोळे हिने केले.