कौशल्य विकास प्रशिक्षण कायर्क्रम

0

शिक्रापूर । ग्रामपंचायत टाकळी भिमा व हाय-टेक फाउंडेशनच्यामार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण कायर्क्रम सुरू करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोग महिला व बालकल्याण निधी अंतर्गत सुनिलतात्या वडघुले व गावातील जेष्ठ लोकांच्या मागार्दशानाखाली युवकांच्या सहकार्याने गावातील 80 महिला व युवतींना टेलरींग, ब्युटीपार्लर, कॉम्प्युटरचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

युवा परिवर्तन संस्थेच्या प्रशिक्षकांमार्फत त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच रविंद्र दोरगे यांच्या शुभस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सुभाष वडघुले, कमल वडघुले, सुमन वडघुले, कविता माहुलकर, शिंधूबाई अवचिते, कविता पाचर्णे, अरुण वडघुले व प्रशिक्षक एकता पराड, मिरा गोळे आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.