नंदुरबार। न्युक्लीअस बजेट व कौशल्य विकास अंतर्गत सन 2016-17 या वर्षात विविध विकास योजनांसाठी नंदुरबार, नवापुर व शहादा तालुक्यातील इच्छुक अनुसूचित जमातीच्या युवक व युवतींची निवड करण्यासाठी 15 मे रोजी 9 वाजता एस.ए.मिशन हायस्कुल, नंदुरबार येथे शिबीर आयोजित करण्यात आले असून या सहभागी होऊन योजनेसंबंधी माहिती घ्यावी असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
या योजनांमध्ये प्रशिक्षणाच्या योजना – टंकलेखन व भरत काम, कौशल्य विकास योजना- सुरक्षा रक्षकाचे प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करुन देणे, अटी व शर्ती- किमान उंची 5 फुट 6 इंच, वजन 50 कि. ग्रॅ., किमान 10 वी उत्तीर्ण असावे. अर्जासोबत 2 पासपोट साईजचे फोटो, जातीचा दाखला, 10 उत्तीर्ण गुणपत्रक, रहिवासी दाखला, आधारकार्ड सादर करा असे सांगितले आहे.