पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने दोन नवीन क्षेत्रिय कार्यालयांची स्थापना करण्यात आली असून, या दोन्ही कार्यालयांचे उद्घाटन क्रांतिदिनी (9 ऑगस्ट) होणार आहेमहापालिकेच्या वतीने दोन नवीन क्षेत्रिय कार्यालयांची स्थापना करण्यात आली असून, या दोन्ही कार्यालयांचे उद्घाटन क्रांतिदिनी (9 ऑगस्ट) होणार आहे, अशी माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिका प्रशासकीय कामकाजासाठी 1997 मध्ये चार क्षेत्रिय कार्यालयांची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालिन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी कामकाजाच्या विकेंद्रीकरणासाठी आणखी दोन क्षेत्रिय कार्यालयांची निर्मिती केली. गेल्या पाच वर्षांपासून महापालिका मुख्यालय आणि सहा क्षेत्रीय कार्यालयांतून प्रशासनाचा गाडा चालविला जात होता.
अध्यक्षपदाच्या निवडणुका होतील
सत्ताधारी भाजपने आणखी दोन क्षेत्रिय कार्यालये वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दोन नवीन क्षेत्रिय कार्यालयांची निर्मिती केली आहेत. या दोन्ही क्षेत्रिय कार्यालयांचे 9 ऑगस्ट रोजी उद्घाटन होणार आहे. त्या अगोदर क्षेत्रिय कार्यालयाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकी घेण्यात येणार आहेत, असेही एकनाथ पवार यांनी सांगितले.
नवीन कार्यालये अशी
’ग’ क्षेत्रिय कार्यालय : प्रभाग क्रमांक 21 (पिंपरीगाव), करसंकलन कार्यालय- प्रभाग क्रमांक 23 (थेरगाव), थेरगाव गावठाण- प्रभाग क्रमांक 24 (गणेशनगर), प्रभाग क्रमांक 27 (रहाटणी). ’ह’ क्षेत्रिय कार्यालय : प्रभाग क्रमांक 20 (संत तुकारामनगर-कासारवाडी), साई शारदा आयटीआय- प्रभाग क्रमांक 30 (दापोडी-फुगेवाडी-कासारवाडी), कासारवाडी- प्रभाग क्रमांक 31 (नवी सांगवी), प्रभाग क्रमांक 32 (सांगवी).