क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात

0

अक्कलकुवा। अक्कलकुवा येथील आदिवासी एकता परिषदेच्या वतीने क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश पाडवी,माजी उपसरपंच जगदीश वसावे, नानसिंग पाडवी, रमेश नाईक,सदानंद नाईक,हिरालाल वळवी, निलेश पाडवी आदींनी क्रांतिकारी बिरसा मुंड्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली.

बिरसा मुंड्या यांच्या कार्याचा उजाळा
येथील आदिवासी एकता परिषदेच्या वतीने वीर क्रांतिकारी बिरसा मुंड्या यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. क्रांतिवीर बिरसा मुंड्या यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य नागेश पाडवी यांनी सांगितले की, क्रांतिवीर बिरसा मुंड्या यांनी पारतंत्र्यात आदिवासींच्या अस्तित्वाची व हक्काची लढाई लढली. आज आदिवासींना मिळालेले हक्क व अधिकार हे त्यांचा महान कार्यामुळेच आहेत. त्यांचा कार्याचा युवा पिढीने अभ्यास करावा. त्यांनी केलेले कार्य समाजापुढे मांडावे जेणेकरून नवीन पिढी संस्कारक्षम व कर्तव्यदक्ष होईल असे आवाहन नागेश पाडवी यांनी केले. यावेळी विजयसिंग पाडवी,पांडुरंग वसावे,रवींद्र नाईक,दिलीप पाडवी, राजू तडवी, सना तडवी,अरविंद पाडवी,तुकाराम वळवी,अविनाश पाडवी,राहुल पाडवी आदींसह आदिवासी एकता परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.