जळगाव। महावितरणच्या जळगांव परिमंडळातर्फे गुरुवारी 3 रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती विद्युत भवन, जुनी औद्योगिक वसाहत येथे साजरी करण्यात आली. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस अधिक्षक अभियंता अशोक साळुंके व दत्तात्रय बनसोडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.याप्रसंगी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर यांनी मनोगत व्यक्त करतांना क्रांतिसिंह नाना पाटील एक लढाऊ स्वातंत्र्यसैनिक, उत्तम वक्ते, पुरोगामी विचारवंत होते.
क्रांतिसिंहाचा जीवन प्रवास उलगडला
महात्मा फुलेंच्या विचारांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. नानांनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक सुधारणेचे कार्य केले असल्याचे नमुद केले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता धनजंय मोहोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीनकुमार मालोदे, उपकार्यकारी अभियंता नितीन पाटील, अजय धामोरे, रविंद्र पवार सहाय्यक अभियंता संजय वाघ, गिरीष चौधरी, देवेंद्र सिडाम, जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे, उपव्यवस्थापक (लेखा) दत्तात्रय निरगुडे, सचिन कोळी, राजेश अहेर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिपक कोळी यांनी परिश्रम घेतले.