क्रांतीगुरु लहुजी साळवे यांची जयंती साजरी

0

यवत । दौंड तालुक्यातील यवत येथील सहकारनगर येथील झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची 223 वी जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

क्रांतीगुरु लहुजी साळवे यांनी स्वतंत्र लढ्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये मुलींची शाळा सुरू केली. त्यासाठी त्यांना लहुजी यांनी मोलाची साथ दिली. तसेच उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक या महापुरुषांना शस्त्र चालविणे व कुस्तीचे प्रशिक्षण लहुजी यांनी दिले. आजन्म ब्रह्मचारी राहून जगेन तर देशासाठी मरेन, अशी प्रतिज्ञा त्यांनी देशासाठी घेतली, असे झोपडपट्टी सुरक्षादलाचे तालुकाध्यक्ष दत्ता डाडर यांनी यावेळी सांगितले. थोर महापुरुष मातंग समाजामध्ये जन्माला आले हे समाजाचे भाग्य आहे. तरुणांनी लहुजींचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही डाडर यांनी यावेळी उपस्थितांना केले. पंचायत समिती सदस्या निशाताई शेंडगे, माजी उपसरपंच समीर दोरगे, काळूराम शेंडगे, भीमराव गवळी, विष्णु बोडके, तानाजी चौघुले, सोमनाथ आरणे, किरण खेडेकर, शालम शेख, मेहबूब शेख,ं संदीप कांबळे आदींसह मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.