जळगाव । सर्वसमावेशक माहितीपूर्ण, पुर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करणार्या अशा क्रांती ज्योती या दिनदर्शिकेचे जिल्हाभरात स्वागत होत आहे. ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून या दिनदशिकेच्या चक्क दोन हजारप्रती मोफत देण्याचा संकल्प हेमंत काळुंखे यांनी केला आहे.
काय आहे दिनदर्शिकेत?
क्रांती ज्योती ही 24 पानी रंगीत दिनदर्शिका आहे. यात जिल्हाभरातील सर्व धार्मिक स्थळे त्यात पाटना देवी, अट्रावल मुंजोबा, पद्मालय, मनुदेवी यासंदभ सर्व धार्मिक स्थळांची सविस्तर माहिती आहे. यासह जिल्हाभरात साजरे होणारे सर्व मोठे यात्रोत्सव, मंदिरांविषयी तसेच गांधीतिर्थ आदी स्थळांची परीपूर्ण माहिती. धार्मिक सणांची माहिती, त्यांचे महत्व, राष्ट्रपुरूषांची संपूर्ण माहिती आहे. याशिवाय प्रत्येक महिन्यात येणारे विविध मुहूर्त देण्यात आले आहे. यासह रूग्णवाहिकेसह महत्त्वाचे दुरध्वनी क्रमांक, महिलांसाठी पाककृती, मुलांंनासाठी अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन, अशा सर्वसमावेशक माहितीने परिपूर्ण अशी ही दिनदर्शिका आहे. या दिनदर्शिकेचे जिल्हाभरात स्वागत होत आहे. ही संपूर्ण माहिती, उपयुक्त असे दुरध्वनी क्रमांक, मार्गदर्शन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी दिनदर्शिकेच्या 2 हजार प्रती मोफत देण्यात येणार असल्याचे हेमंत काळुंखे यांनी सांगितले आहे. अधिक माहितीसाठी 9881754543 या क्रमांकावर संपर्क करावा.