क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाची कार्यकारिणी जाहीर

0

जळगाव । शहरातील क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळाच्या वतीने नुकत्याच झालेल्या एका बैठकीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष नानाभाऊ पोपट महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत सर्व संमत्तीने महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सरला प्रकाश महाजन तर सचिवपदी सुवर्णा राजेंद्र महाजन यांनी निवड करण्यात आली. या प्रसंगी पुढील दोन वर्षासाठीची कार्यकारीणी घोषित करण्यात आली.

कार्यकारिणी महिला सदस्यांची निवड
माळी समाज सेवा मंडळाची कार्यकारिणी सदस्या याप्रमाणे, अध्यक्षपदी सरला महाजन, उपाध्यक्षपदी पल्लवी गिते, सचिवपदी सुवर्णा महाजन, सहसचिव अलका मगरे, खजिनदार अनिता महाजन, सर्व सदस्या म्हणून अनिता महाजन, सुनिता माळी, सिमा महाजन, सुशिला महाजन, अंजना माळी, जयश्री महाजन, संदिपा महाजन, सौ. अलका शिवा महाजन, सौ. उर्मिला बापुराव महाजन, मंगला महाजन, मिनाक्षी राजोळे, अनिता महाजन, अनिता महाजन, विजया महाजन, वंदना माळी, शशिकला प्रभाकर महाजन आदी महिला सदस्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या कार्यकारिणीतील सदस्यांची मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आल्याची माहिती क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळाचे सचिव प्रमोद माळी यांनी कळविले आहे.