नवापूर । महिलांना खर्या अर्थाने सावित्रिबाई फुले यांनी न्याय दिला. त्यांचामुळेच आम्ही शिक्षण घेत आहोत, असे विचार जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी केले. नवापूर नगरपरिषदतर्फे महिला व बालकल्याण समिती आणि दिनदयाळ अत्योंदय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान (ऊ-ध-छणङच्) जागतिक महिला दिन निमित्त महिला मेळावा नवापूर टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या.
बचतगटांना फिरता निधी वाटप
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली उपस्थित मान्यवरांचा सत्कार नगराध्यक्षा हेमलता पाटील, सह नगरसेविका यांनी केला. आपला परीसर हा स्वच्छ ठेवला पाहीजे. नंदुरबार जिल्हा हा सर्वानी मिळुन हगणदारीमुक्त करायचा आहे. यामध्ये नवापूर शहरात पण स्वच्छता मोहीमेचे काम चांगले होत असल्याचे अध्यक्षा रजनी नाईक यांनी सांगितले. दोडाईचा येथील 5 वर्षाचा बालीकेवर झालेल्या अत्यांचाराचा यावेळी निषेध करण्यात आला. या कार्यक्रमांची प्रस्तावना मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी केली तर. आभार प्रसंगी नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी सांगितले की, महिलांनी एक संघ राहून चांगली पिढी घडवावी, समाजासाठी चांगले कार्य करावे. शहरातील महिलांना कोणत्याही समस्या आल्यास मी त्यांचासाठी सदैव कार्यरत असून त्यांचा समस्या सोडवेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या चौधरी यांनी केले. यावेळी नवापूर शहरातील 406 महिला उपस्थित होत्या यांनतर 8 महिला बचत गटांना फिरता निधी उपस्थित मान्यवरांचा हस्ते वाटप करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प अध्यक्षा रजनी नाईक यांनी केले तर कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी जि. प सदस्या संगिता गावीत या उपस्थित होत्या. यावेळी नगराध्यक्षा हेमलता पाटील, महिला बाल कल्याण सभापती सारीका पाटील, अरुणा पाटील, मिनल लोहार, बबीता वसावे, सविता नगराळे, रेणुका गावीत मंगला सैन, मंजु गावीत, सुर्या शहा, महिमा गावीत, नगरसेवक आशिष मावची, मृदुला भांडारकर, डॉ तेजल शहा, प्रजापती ब्रमकुमारीचा साधना दीदी, तहसीलदार प्रमोद वसावे, नायब तहसिलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, न. पा मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे प्रकल्प अधिकारी प्रशांत भट, मिनाक्षी भट आदी उपस्थित होते.