शिरपूर । येथील शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर.सी.पटेल प्राथमिक शाळा, शिरपूर येथे क्रांती दिनानिमित्त गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम गट :1 ली व 2 री द्वितीय गट: 3 री व 4 थी. प्रथम गटात 78 तर द्वितीय गटातून 280 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील यशस्वी वर्ग पुढीलप्रमाणे : सामुहिक गायन पहिला गट: प्रथम इयत्ता 2 री तुकडी मोगरा द्वितीय:इयत्ता 2 री तुकडी गुलाब यांनी यश संपादन केले.
सदर वर्गांना वर्गशिक्षिका स्मिता साळुंखे व वंदना सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. द्वितीय गट: 3 री व 4 थी.यशस्वी वर्ग खालील प्रमाणे,प्रथम:इयत्ता 4 थी तुकडी गुलाब.द्वितीय:इयत्ता 4 थी तुकडी जास्वंद तृतीय:इयत्ता 4 थी तुकडी चाफा उत्तेजनार्थ:इयत्ता 3 री मोगरा.सदर वर्गांना वर्गशिक्षक संदीप चौधरी, सुभाष भिल,गोपाल न्हावी,जगदीश सोलंकी यांचे मार्गदर्शन लाभले. वैयक्तिक गीत गायन प्रकारात वर्गनिहाय प्रथम दोन क्रमांक काढण्यात आले.अशा 16 वर्गांमधून 32 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. स्पर्धा परीक्षण मुख्याध्यापक सी.डी.पाटील, मोहिनीं सोनवणे व बबिता काटोले यांनी केले.