क्रांतीनगर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा

0

शिरपूर । शहरातील क्रांतीनगर येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मनोज पाटील होते. वक्तृत्व स्पर्धेत इ. 1 ली ते 7 वी पर्यंतचे विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे तीन गट तयार करण्यात येवून त्यांतून प्रत्येकी दोन उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. परीक्षक म्हणून श्री अहिरे सर व श्री पंडीत सर यांनी काम पाहिले. शिक्षक गणेश चौधरी, भूषण पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन श्रीमती जे.पी. पाटील यांनी केले. आभार भूषण पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.