क्रांतीवीर चापेकर वाड्यात जागतिक योग दिन उत्साहात

0

पिंपरी-चिंचवड :- आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती, सोहम योग साधना आणि आपले चिंचवड व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने चापेकर वाड्यात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 350 जणांनी योग साधना केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी खासदार अमर साबळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिलिंदराव देशपांडे, प्रांत कार्यकारणी सदस्य विनायकराव थोरात, क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह सतीश गोरडे, सह कार्यवाह रवी नामदे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजानन चिंचवडे, समितीचे सदस्य अशोक पारखी, गतीराम भोईर, संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

असे दिले योगाचे धडे
योग शिक्षक दिगंबर उचगावकर व अनुजा उचगावकर यांनी योगाचे धडे दिले. यामध्ये पूरक हालचाली, सूर्य नमस्कार, आसने, प्राणायामाचे धडे दिले. पूरक हालचालींमध्ये खांदा, कंबर, गुडघा, मानेचा व्यायाम, भद्रासन, भुजंगासन, दंडासन, ताडासन, नटराजासन, वीरभद्रासन, पतंगासन, पवनमुक्तासन, सेतू, वंदावन अशी आसने करण्यात आली. एकाचवेळी ३५०जणांनी योग साधना केली. प्रास्ताविक सतीश गोरडे यांनी केले. सूत्रसंचालन रवी नामदे यांनी केले. तर, दिगंबर उचगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन सिद्धेश्वर इंगळे आणि अतुल आडे यांनी केले.