पिंपरी : महापालिकेतर्फे क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चिंचवड येथील पुतळ्यास उपमहापौर शैलजा मोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे, भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे, नितीन घोलप, दशरथ कसबे, प्रकाश मिटभाकरे, सतीश भवाळ, सुनिल भिसे, धनंजय भिसे,वसंत वावरे, आशाताई शहाणे, मिनाताई खिलार,यादव खिलारे, हनुमंत कसबे,सचिन पारवे,नाना कसबे,मारुती दाखले,सुरेश जोगदंड, संजय ससाणे,विशाल कसबे, बाळासाहेब खंदारे,भगवान शिंदे,संदीप जाधव,शिवाजी साळवे,किशोर हातगळे,आसाराम कसबे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश भोसले यांनी केले. नितीन घोलप यांनी आभार मानले.
हलगी वादनाच्या कार्यक्रमानंतर महाराष्ट्र शासन पुरस्कृत शाहिर बापू पवार यांनी लहूजी वस्ताद साळवे यांच्या जीवन कार्यावर शाहिरी जलसा कार्यक्रम सादर केला. तसेच व्याख्यान व प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम झाला.