क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना अभिवादन

0

भुसावळ। एका जाती-धर्मासाठी नव्हे तर प्रत्येक भारतीयांसाठी शिक्षण आणि सुधारणावादी विचार प्रसारित करणार्‍या, जातियता, अंधश्रद्धा व गुलामगिरी याविरोधात सुधारणावादी कार्य करणार्‍या थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या 190 व्या जयंती निमित्त शहर व परिसरातील विविध संघटनांतर्फे कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय दलित पँथर संघटनेच्या विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंच्या संयुक्त जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात कार्यक्रम घेण्यात आला.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी शहर पोलीस स्थानकाचे निरीक्षक वसंत मोरे होते. याप्रसंगी रेल्वे सुरक्षा बलाचे माजी आयुक्त रमेश सरकटे यांना एलगा साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सिध्दार्थ सोनवणे, जिल्हाप्रमुख सुदाम सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश जाधव, रविंद्र सोनवणे, राजू महाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मुनाफ कुरेशी, शहराध्यक्ष राजू तायडे, रितेश नायके, बाळासाहेब सोनवणे, दिपक सोनवणे, सुरेश यशोदे, विलास सातदिवे, रंजना सोनवणे, निर्मला पाटील, वंदना चव्हाण, सुजाता सपकाळे, कृष्णा निकम उपस्थित होते. मुकुंद महाले यांनी आभार मानलेे.

जिल्हा काँग्रेसतर्फे करण्यात आले प्रतिमा पूजन
नसरवानजी फाईलमधील राजीव गांधी वाचनालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंंती साजरी करण्यात आली. जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागातर्फे दलितमित्र लालाजी ढिवरे, विजय नरवाडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. अ‍ॅड. एम.एस. सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मो. मुनव्वर खान, जिल्हा उपाध्यक्ष जे.बी. कोटेचा, यु.एल. जाधव, विनोद शर्मा, चंद्रसिंग चौधरी, दिपक जैन, डॉ. नईम मजहर, शहराध्यक्षा कल्पना तायडे, महेबूब खान, अन्वर खान, अनिता खरारे, जगपालसिंग गिल, सायराबानो, यास्मिनबानो, सलिम गवळी, अन्वर तडवी, फकरुद्दीन बोहरी, प्रदिप नेहेते, कैलास चौधरी, विवेक नरवाडे, भिमराव तायडे, शिला परदेशी उपस्थित होते.

वरणगाव शहरात मार्गदर्शन कार्यक्रम
सिद्धेश्वर नगर येथे छोट्याखानी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामीण रुग्नालयांचे डॉ.बडगुजर होते. त्यांनी क्रांतिसुर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपस्थित अंगणसेविका शलेजा बोदडे, अंगणसेविका पुष्पा सोनार, निर्मला जोहर, सविता माळी, मिनाक्षी माळी, पद्मा माळी, सिंधु माळी, मंगलाबाई माळी, जिजाबाई माळी, अनिता जैनकर, कस्तूराबाई इंगळे, शोभा कोळी, सखाराम माळी, बाळू माळी, निलेश माळी, कुंदन माळी, जीतूमराठे, भूषण माळी, किरण माळी, सचिन माळी हे उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचे आयोजक व दक्षता समिती अध्यक्षा सविता माळी यांनी आभार व्यक्त केले.