क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांना अभिवादन

0

भुसावळ।  क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त शहरातील राजपूत समाजातर्फे चव्हाण ऑफ्टीकल सभागृहात प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी शहर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष संजयसिंग चव्हाण यांनी महाराणा प्रताप यांचे जीवन तरुण पीढीसाठी आदर्श असून तरुणांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनकार्याबद्दल अभ्यास करुन समाजहितासाठी काम करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
याप्रसंगी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर, प्रदीप देशमुख, चोरवडचे सरपंच वामन पाटील, योगेंद्रसिंग पाटील, शाम गोविंदा, अनुपसिंग ठाकूर, प्रमोद राजपूत, पवन मेहरा, गोपीसिंग राजपूत, दिनेशसिंग राऊळ, संदीपसिंग पाटील आदी समाजबांधव उपस्थित होते.