आमदार संजय सावकारे ; भुसावळात स्मृतीशिलेचे लोकार्पण
भुसावळ- वाघूर धरणाला क्रांतीसूर्य महाराणा प्रताप जलसागर असे नामकरण करण्यासाठी विधानसभेत अशासकीय ठराव मांडू, अशी ग्वाही तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी येथे दिली. वसंत टॉकीज परीसरात महाराणा प्रताप चौकातील स्मृतीशिलेच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. शहरात राजपूत समाजबांधवांना सामाजिक हॉलसाठी नगरपालिकेने जागा उपलब्ध करुन द्यावी, आपण त्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी देऊ, अशी घोषणा आमदार सावकारे यांनी यावेळी केली.
यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, नगरपालिका गटनेते हाजी मुन्ना तेली, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगसेवक महेंद्रसिंग ठाकूर, मेघा वाणी, पिंटू कोठारी, किरण कोलते, अॅड.बोधराज चौधरी, रमेश मकासरे, अमोल इंगळे, ललित मराठे, बापू महाजन, भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष संजयसिंग चव्हाण, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, श्याम गोविंदा आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नामकरण व चबुतर्याचे लोकार्पण करण्यात आले. नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, महाराणा प्रताप चौकाला आगामी काळात अनन्यसाधारण महत्व येणार आहे. या चौकाच्या शेजारीत पालिकेचा भुखंड असून या ठिकाणी भव्य पालिका प्रशासकीय इमारत साकारली जाणार आहे. यामुळे या चौकाचे आगामी काळात सौदर्यीकरण होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी पालिकेचे सर्व सभापती, नगरसेवक, राजपूत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर व सूत्रसंचालन शांताराम पाटील तर आभार रणजीतसिंग राजपूत यांनी मानले.