मुंबई । महाराष्ट्र जनता दल सेक्युलर पक्षाच्या वतीने 9 ऑगस्टच्या क्रांती दिनापासून ’भाजपा हटाव, शेतकरी बचाव’ आंदोलन राज्यभर करणार असल्याची माहिती जनता दल प्रदेश कार्याध्यक्ष रेवण भोसले यांनी दिली आहे. दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार, बेरोजगार तरुणांची भाजपा सरकार क्रूर थट्टा करत आहे. शेतमालाला हमीभाव व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीला तिलांजली दिली जात आहे. कर्जमाफीच्या नावाखाली भाजपा सरकारने शेतकर्यांची ऐतिहासिक फसवणूक केलेली आहे. ‘भाजपा हटाव, शेतकरी बचाव’ आंदोलनात सर्व शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार व बेरोजगार तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहनही भोसले यांनी केले आहे.