ठाणे । आपण सारे आयोजित क्रांती दौडच्या सातव्या सत्रात वनवासी विकास आश्रमच्या ज्ञानेश्वर मोगराने 25 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत बाजी मारली होती. यावेळी आयोजकांनी 25 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेवर काट मारली असली तरी ज्ञानेश्वरने मात्र सातत्यपूर्ण कमागिरीत खंड पडू दिला नाही. ज्ञानेश्वरने यावेळी आपण सारे आयोजित रन फॉर चलेजाव क्रांती दौडमध्ये वर्चस्व राखताना पुरूषांच्या 10 किलोमीटर अंतराच्या शर्यतीचे विजेतेपद मिळवले. महिलांच्या 10 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत मुंबईच्या वर्षा भवानीने पहिला क्रमांक पटकावला. पुरूषांच्या गटात ज्ञानेश्वरला याही वर्षी शर्यत जिंकताना फारशी लढत मिळाली नाही. त्याने ही शर्यत जिंकताना दुसर्या क्रमाकांवर आलेल्या आपलाच सहकारी अजित माळीला 1 मिनीटाच्या फरकाने मागे टाकले. ज्ञानेश्वरने ही शर्यत जिंकण्यासाठी 30:41:56 मिनीटे एवढा वेळ घेतला. अजितने ही शर्यत 31: 33: 12 मिनीटांमध्ये पूर्ण केली.उरण जिमखान्याचा सुजीत गमरेने 32:33:12 मिनीटे अशी वेळ नोंदवून तिसरा क्रमांक मिळवला.विजेत्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे मानकरी देवेंद्र झझारिया,आपण सारेचे बाळकृष्ण पुर्णेकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ज्ञानेश्वरची जीवनाची लढाई
व्यसनाधीन मातापिता, शेतीतून मिळणारे अल्प उत्पन्न, त्यात आदिवासी समाजात असलेल्या रितीरिवाजाप्रमाणे लवकर झालेले लग्न. अशा परिस्थितीत संसाराचा गाडा हाकण्यासाठी रोड रेसेसमध्ये मिळणार्या रोख बक्षींसासाठी धावणार्या विक्रमगडच्या ज्ञानेश्वर मोगरा धावतोय. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड सारख्या दुर्गम भागात राहणारा ज्ञानेश्वर आपल्या पत्नीसह मोलमजुरी करून आईवडील आणि इतर कुटुंबीयांचा सांभाळ करतो. समाजातील चालीरीतींप्रमाणे लवकर लग्न झाल्यामुळे 23 वर्षीय ज्ञानेश्वर तीन वर्षाच्या मुलाचा पिताही आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही ज्ञानेश्वरने विक्रमगडमधील डोंगराळ भागात खडतर सरावात खंड पडू दिला नाही. ज्ञानेश्वरची जिद्द बघून वनवासी कल्याण आश्रम आणि सतीश चव्हाण यांनी त्याला मदतीचा हात दिला. चव्हाण तर प्रशिक्षक, पालक म्हणून ज्ञानेश्वर जिकडे स्पर्धेला जाईल तिथे जात असतात. या स्पर्धेतून मिळालेल्या पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसातील रक्कमेतील थोडा हिस्सा कुटुंबासाठी, इतर स्पर्धांच्या तयारीसाठी वापरणार असल्याचे ज्ञानेश्वरने सांगितले.
स्पर्धेचा गटनिहाय निकाल
18 वर्षे गट : 6.5 किलोमीटर मुले : रोहिदास मोरगा (पालघर) 21:01:05 मिनीटे, रोहीत मांडवकर (ठाणे) 23:48:89 मिनीटे, मुकेश बिंद (ठाणे) 22:51: 27 मिनीटे. मुली : प्रतिक्शा कुलये (मुंबई ) 28:17:05 मिनीटे, हर्षाली भोसले (ठाणे) 28:21:05 मिनीटे, दर्शना दांगटे (मुंबई) 29:26:06 मिनीटे.
15 वर्षाखालील 4 किलोमीटर, मुले : निहार गायकवाड ( मो.ह.विद्यालय) 12:13 मिनीटे, रिषीराज धरणे (मो.ह.विद्यालय) 12:17 मिनीटे, यश शिंदे (लोकपुरम पब्लिक स्कुल) 12:52 मिनीटे. मुली : दिक्शा सोनसुरकर (अॅचिव्हर्स स्पोर्ट्स क्लब) 15:37 मिनीटे, अदिती पाटील (लोकसिटी ट्रस्ट) 16:29:02 मिनीटे, कृणाली पवार (रायझिंग स्टार).
12 वर्षाखालील 3 किलोमीटर, मुले : सोहम पाटील (लोकपुरम सिटी ट्रस्ट) 11:42 मिनीटे, क्रिश यादव (श्री मॉ निकेतन) 12:03 मिनीटे, सोहम मिंडे ( सेव्हन स्टार्स स्पोर्ट्स क्लब ) 12:03 मिनीटे. मुली : परिणा खिल्लारी (ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुल) 12:18 मिनीटे, रेवा डिसा (रायझिंग स्टार्स) 12: 36:08 मिनीटे, संजना सावंत ( ट्रॅक अँड फिल्ड) 13:06:0 मिनीटे.