पिंप्राळा – इच्छादेवी चौकात अर्ध्या तासात घडल्या दोन घटना; एका संशयिताचे रेखाचित्र जारी
जळगाव – क्राइम बँंचचे अधिकारी असल्याचे सांगून पिंप्राळा व इच्छादेवी मंदिर चौकात दोन जणांना रविवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास लुटले. अर्धा तासात दोन जणांना लुटणार्या दोघांपैकी एका संशयिताचे रेखाचित्र पोलिसांनी जारी केले आहेत.
पिंप्राळा परिसरातील भवानी मंदिराजवळ प्रदीप पुरुषोत्तम सोमाणी (वय 51) यांना क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून झडती घ्यावयाची, असे सांगितले. त्यांना ओळखपत्र दाखविण्यात आले. सोमाणी यांच्या गळ्यातील 20 ग्रॅमची सोन्याची साखळी, तीन हजार रुपये रोख लांबवून चोरटे मोटारसायकलवरुन पसार झाले. तसेच इच्छादेवी चौक परिसरातील बेंद्रे हॉस्पिटलजवळ सुनील पितांबर चौधरी (वय 60, रा. आयोध्यानगर) यांनाही क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे सांगून ठगविण्यात आले. सुनील चौधरी यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी, 9 ग्रॅम सोन्याची अंगठी, पाच ग्रॅम अंगठी असा ऐवज लंपास केला. याबाबत रामानंदनगर पोलिसांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी परिसरात सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यावरुन दोघांपैकी एका संशयिताचे रेेखाचित्र पोलिसांनी जारी केले आहे. यासंदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.क्राइम ब्रँचच्या तोतया अधिकार्यांनी दोन जणांना ठगविले